वीस वर्षापूर्वी नागपूर येथील अधिवेशनावेळी आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे समांतर अधिवेशन ठेवले होते.. त्यावेळी मी महामंडळाचा जॉइन्ट सेक्रेटरी होतो.. मा. विलासराव देशमुख अधिवेशनाला आले होते, त्यावेळी माझे अर्धा तास भाषण त्यांच्या समोर झाले.. त्यांनी त्यांच्या भाषणात माझे अठरा वेळा नाव घेतले.. मी माझ्या भाषणात महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था आणि खासगी शिक्षण संस्था चालकांचे प्रश्न व थकीत वेतनेतर अनुदान या विषयावर बोललो..
दुसऱ्या दिवशी साहेबांनी 1999 पासून थकित महाराष्ट्रातील सर्व शाळांचे रुपये 700 कोटी वेतनेतर अनुदान मंजूर केले, दुसर्‍या वर्षात पुन्हा 440 कोटी मंजूर केले व तातडीने राज्यातील सर्व शाळांना 1140 कोटी वितरीत केले.. 1995 ते 2000 पर्यन्त वेतनेतर अनुदान नसल्याने महाराष्ट्रात नाईलाज म्हणून शाळा चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात संस्था चालकांना शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे कडून दरमहा मदत घ्यावी लागत होती.. वेतनेतर अनुदान मंजुरीनंतर शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा त्रास कमी झाला.. स्व. विलासराव देशमुख साहेब यांचे आपल्यावर मोठे उपकार आहेत. हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय प्रसंग आहे.. त्यांनी मला जवळ घेऊन फोटो काढायला सांगितला..

प्रा. एन. डी. बिरनाळे
उपाध्यक्ष
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य 🙏

Comments

Popular posts from this blog